मित्रानो “NHM Satara Jilha Parishad Bharti 2025” – सातारा जिल्हा परिषद भरती 2025 – द्वारा प्रकाशित केलेल्या जाहिरातीप्रमाणे – स्टाफ नर्स आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – या दोन जिल्हा परिषद विभागातील पदांसाठी रिक्त जगासाठी भरती निघालेली आहे, तर इच्छुक उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लास्ट डेट 07 एप्रिल 2025 असणार आहे.
” सातारा जिल्हा परिषद विभागामध्ये “जर आपली निवड झाली असल्यास आपल्याला 20,000 ते 35,000/- पर्यंत सुरवातीला वेतन पाहायला मिळेल, आणि हि एक (Contract Basis ) जॉब असणार आहे, त्याच बरोबर हि एक “महाराष्ट्र शासन सरकारी जॉब” आहे, आणि या भरती साठी महिला व पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात.
तुम्हाला “NHM Satara Jilha Parishad Bharti 2025 ” या भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे, तुम्ही संपूर्ण माहिती मिळवू शकता, आणि नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या WhatsApp Channel ला जॉईन व्हा.
NHM Satara Jilha Parishad Bharti 2025-Short Info
विभागाचे नाव | सातारा-आरोग्य विभाग |
कॅटेगरी | महाराष्ट्र शासन सरकारी जॉब |
वयाची अट | 18 ते 38 वर्षे ( राखीव प्रवर्ग कमाल 43 वर्षे ) |
अर्ज कोण करू शकतो | महाराष्ट्र राज्यातील उमेदवार |
Gender Eligibility | Male & Female |
अर्ज पद्धती | Offline |
अनुभव/फ्रेशर | फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात |
वेतन | 20,000 ते 35,000/- |
अर्ज फी | 150/- |
नोकरीचा प्रकार | Contract Basis (कंत्राटी जॉब) |
निवड प्रक्रिया | मेरिट लिस्ट |
Apply Start Date | 24 मार्च 2025 |
Apply Last Date | 07 एप्रिल 2025 |
Official Webiste | Www.zpsatara.gov.in |
Apply Online | – |
नोकरीचे ठिकाण | सातारा |
जाहिरात (Notification) |
अर्ज सादर कार्याचा पत्ता ?
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि.प. सातारा
सातारा जिल्हा परिषद भरती 2025- Post Vacancy
पदाचे नाव | वय | रिक्त पदे | संवर्ग |
स्टाफ नर्स (NHM अंतर्गत) | राखीव 43 (NHM कार्यरत कर्मचारी 5 वर्षे शिथिल) | 06 | EWS-06 |
स्टाफ नर्स (१५ वा वित्त आयोग अंतर्गत) | राखीव 43 (NHM कार्यरत कर्मचारी 5 वर्षे शिथिल) | 04 | EWS-03, NT-C-01 |
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | राखीव 43 (NHM कार्यरत कर्मचारी 5 वर्षे शिथिल) | 01 | SEBC-01 |
एकुण | 11 |
Salary and Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता | एकत्रित मानधन |
स्टाफ नर्स (NHM अंतर्गत) | GNM/Bsc Nursing | Rs. 20,000/- |
स्टाफ नर्स (१५ वा वित्त आयोग अंतर्गत) | GNM/Bsc Nursing | Rs. 20,000/- |
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक | Any Medical Graduate (MBBS/BAMS/BHMS/BUMS/BDS) with MPH/MHA/MBA in Health | Rs. 35,000/- |
Selection Process
- Merit List
अटी व शर्ती
- स्टाफ नर्स ही पदे EWS व NTC या संवर्गाकरिता असतील. इतर संवर्गातील उमेदवारांनी अर्ज केला तरी तो अपात्र ठरवीला जाईल. व याबाबत कोणताही आक्षेप वा पत्रव्यवहार विचारात घेतलाजाणार नाही.
- उपरोक्त पदे ही कंत्राटी स्वरुपाची असुन नियुक्ती १२ महिन्यांकरीता असेल.
- जाहीरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पद आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु नाही, तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावुन घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
- अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
- उपरोक्त कंत्राटी पदांकरीता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल.
- जाहिराती मध्ये आपापल्या दिलेल्या बँक डिटेल्स मध्ये अर्ज फीस पाठ्वाची आहे.
पात्र उमेदवारांना पुढील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे गुण देण्यात येणार आहेत.
विवरण | विवरण तपशील | अधिकतम गुण |
पदासाठी आवश्यक (Qualifying Exam) मधील गुण (अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे) | मिळालेल्या एकूण गुणाच्या टक्केवारीचे 60 प्रमाणे पॅप्रोशन काढावे. (उदा. 60 टक्के गुण प्राप्त असल्यास त्याचे 60 प्रमाणे Proportion =60*60/100=36) | 60 गुण |
पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास (संबंधित विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अर्हता असल्यास विचारात घेतली जाईल.) | अधिकतम 20 गुण दयावेत. (उदा. कार्यक्रम सहाय्यक (स्टॅटिक्स) पदासाठी मुळ शैक्षणिक अर्हतेसह Post Graduate उमेदवाराने अर्ज केला असल्यास त्यास 20 गुण दिले जातील.) | 20 गुण |
शासकीय व निमशासकीय अनुभव असल्यास (किमान अनुभव 06 महिने) | प्रत्येक 1 वर्षासाठी 4 गुण दयावेत. (6 महिन्यांसाठी 02 गुण) फक्त शासकीय संस्था विभाग शासन अंगीकृत संस्था यांचाच अनुभव ग्राहय धरणेत येईल. जास्तीत जास्त 05 वर्षांपर्यंत | 20 गुण |
Documents
- Mobile number
- E-mail Id
- 2 Photos (Passport size)
- शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व सर्व वर्षांच्या गुणपत्रिका
- राखीव उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा/जन्म तारखेचा दाखला
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- प्रमाणित केलेली शासकिय/निमशासकिय अनुभव प्रमाणपत्रे
- नावात बदल असलेस त्यासंबंधिचा पुरावा (राजपत्र/विवाह नोंदणी प्रमाणपत्र)
- संबंधित कौन्सिलचे Registration व Renewal Certificate
अर्ज कुठे सादर करायचा ?
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जि.प. सातारा
मित्रानो, वर दिलेल्या जाहिरात PDF मध्ये अर्ज नमुने 5 ते 7 पेज वरील अर्ज नमुना चे प्रिंट काढून घ्याचे आहे.
नोट: या भरती साठी फॉर्म आपल्याला PDF / जाहिरात मध्ये पाह्यला मिळेल. त्या फॉर्म ला भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून पोस्टाने अर्ज पाठवावा.